विधानसभेच्या जागा वाटपाबाबत Chandrakant Bawankule यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक इशारा, म्हणाले…

186
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत Chandrakant Bawankule यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक इशारा, म्हणाले...
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत Chandrakant Bawankule यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक इशारा, म्हणाले...

बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये पार पडणार पडणार आहे. त्यामुळे सामान्यांसह सर्वच राजकीय पक्ष आता निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. राजकीय नेतेमंडळी बैठका, चर्चासत्र आणि प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. मात्र विधानसभा निवडणूसाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली नाहीत. यासाठी केंद्रीय निवडणूक समिती सोबत बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीमधून भाजपाची पहिली यादी (First list of BJP candidate) जाहीर होईल. असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. (Chandrakant Bawankule)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या क्षेत्रात भाजपाचीपकड मजबूत आहे. अशा जागांसाठी बुधवारच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (Central Election Committee) बैठकीत चर्चा होईल. तसेच महायुतीमध्ये “जो उमेदवार ‘ती’ जागा जिंकण्याची शक्यता जास्त आहे, अशा उमेदवाराला त्या मतदारसंघाची जागा देण्यात येईल.” असे चंद्रकांत बावणकुळे यांनी सांगितले. 

(हेही वाचा – Malad येथे रिक्षाचालकांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी दहा आरोपींना अटक)

पुढे बावणकूळे म्हणाले की, आमचा (भाजपा) पक्ष मोठा आहे. त्यामुळे आम्हाला जास्त हिस्सा मिळावा. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी मोठं मन करून त्याग करावा असा इशारा वजा सूचना चंद्रकांत बावणकूळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. महायुतीमध्ये ताणतणाव ठेवून निवडणुकांना सामोरं जातं येत नाही. कुणाचा त्याग किती? याचा मीटर लावता येत नाही. त्यामुळेच महायुतीने एकदा निर्णय घेतला तर तो बदलणार नाही. असे विधान चंद्रकांत बावनकूळे (Chandrakant Bawankule) यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.