राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या २ कित्येक पासून सुरुच आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पंरतु कर्मचाऱ्यांच्या मागणीवर अद्याप ठाकरे सरकारवर कोणताच तोडगा काढला नसल्याने संप कायम सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटी डेपोंच्या भूखंडावर काही लोकांचा डोळा आहे. हे भूखंड लाटण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असून म्हणूनच एसटीच्या संपावर तोडगा निघत नाही, असा गंभीर आरोप करतानाच मुख्यमंत्र्यांनी कधी जमिनी लाटल्या नाहीत. त्यामुळे या भूखंड लाटण्यासाठी हा प्रकार सुरू आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
(हेही वाचा – महापालिकेच्या ‘या’ विभागांच्या प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची खांदेपालट)
मुख्यमंत्री हे तुम्हाला कळणार नाही
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारवर चंद्रकांत पाटलांनी घणाघात केला आहे. तसेच राज्य सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोपही केले आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, या सरकारला एसटीचे नेटवर्क मोडून काढायचे आहे. कोणत्यातरी प्रायव्हेट वाहतूक वाल्यांशी त्यांचे कंत्राट झाले आहे. हे सगळे मोठे डेपो त्यांना विकायचे आहे. जमीनीवर डोळा असणारेच आहेत. मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे हे तुम्हाला नाही कळत आहे. तुम्ही अशा कधी जमीनी लाटल्या नाहीत. हे जमीन लाटण्यासाठी चालले आहे हे तुम्हाला नाही कळणार , असेही पाटील म्हणाले.