चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी गुरुवारी शिरुर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानावर भाष्य केले. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यानंतरही मौन बाळगले आहे.
(हेही वाचा – Amol Kirtikar यांच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा सहभाग)
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा सपाटा लावला होता. त्या वेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपवणार आहे. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची तेव्हा फारशी चर्चा झाली नव्हती. मात्र रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल केला आहे. त्यानंतर गुरुवारी चंद्रकांत पाटील यांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते, तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule). पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो. नंतर आम्ही चंद्रकांत पाटील यांना म्हणालो की, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी आले असतांना प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना अजितदादांच्या टिप्पणीविषयी विचारणा केली. चंद्रकांत पाटील यांनी त्यावर चकार शब्दही न काढता मौन बाळगणे पसंत केले.
या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बाजू सावरली आहे. ते म्हणाले, “अजितदादा नाराज किंवा त्यांनी पाटील यांना सुनावले या बातम्या कपोल्कपित आहेत. निवडणुकीत जेव्हा आपण प्रचार करतो, तेव्हा विरोधकांबद्दल असे बोलावे लागते. मते मागण्यासाठी काही उपरोधिक बोलावेच लागते.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community