काळ तुम्हाला सांगेल. आज काही जण जात्यात आहेत, काही सुपात आहे. जात्यात होते त्यांचे पीठ झाले आहे आणि आता सुपातले जात्यात जाऊ लागले आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी त्यांच्या बॅगा बांधून ठेवल्या आहेत. किरीट सोमय्या हे त्यांचे कर्दनकाळ ठरत आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
राऊतांना माझी चेष्टा महागात पडेल
अतुल भातखळकर यांनी केलेली मागणी योग्यच आहे. या चौकशीतून आता कुणी सुटणार नाही. संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते, पण ती चेष्टा अंगावर येणार आहे. मी सामना वाचणे बंद केले आणि संजय राऊतांवर बोलणे बंद केले, असेही पाटील म्हणाले.
(हेही वाचा केजरीवालांकडून काश्मिरी पंडितांची अहवेलना! का सुरु झाला #KejriwalAgainstHindus ट्विटर ट्रेंड)
किरीट सोमय्या कर्दनकाळ ठरत आहेत
आमची सत्ता असताना आहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची उभारणी केली. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकचे लोकार्पण केले जाणार आहे, पण विरोधी पक्षनेते यांना आमंत्रण नाही. शरद पवार येईपर्यंत जमावबंदी लावली आहे, पवार येणार तेव्हाही जमावबंदी लावा ना, पोलीस दबाव टाकत आहेत, हे फार दिवस चालणार नाही. कोल्हापुरात देखील 8 वर्षांपूर्वीच्या केसेस काढल्या जात आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमदारांना मातोश्रीत भेट दिली जात नाही
अजित पवार तुम्ही श्रेय घ्या, पण एसटी कामगारांचा संप मिटवा, अशी मी चिट्टी लिहिली. केवळ अजित पवार हेच हा संप मिटवू शकतात, कारण अजित पवारच करू शकतात, तेच सांगतात काम होईल का नाही, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेचे सगळे आमदार एकनाथ शिंदेंकडे जातात, अजित पवारांकडे जातात, आम्हाला खूश करा म्हणातात, एकही आमदार मातोश्रीत जात नाही, कारण त्यांना भेटच मिळत नाही, चंद्रकांत पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community