…तर बाळासाहेबांनी थोबाडीत मारली असती!

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.

64

तुम्ही राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, तुम्हाला कुणाचा आक्षेप नाही. देशातील 5 टक्के मुसलमान गडबड करतात, 95 टक्के मुसलमान हे प्रामाणिक आहेत. पण, जे 5 टक्के मुसलमान गडबड करतात, त्यांच्यावर तुम्ही टीका करणार नाहीत का? मालेगाव आणि नांदेडमध्ये अशांतता निर्माण करणा-यांवर पूर्वी सारखीच टीका करा. आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जीवंत असते, तर त्यांनी थोबाडीत मारली असती, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना सुनावले.

त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. संजय राऊतांनी या आंदोलनामागे भाजपाचा हात आहे, असे वक्तव्य केले. त्याचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला.

(हेही वाचा : गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान)

…तर तुम्ही दुबळे आहात!

राऊतांना झोपताना – उठताना सारखी भाजपा दिसते. एसटी कर्मचा-यांचा संप आम्ही सुरु केला, आरोग्य परीक्षांचे पेपर आम्हीच फोडले. शेतक-यांचे पैसेही भाजपानेच थांबवले. काय चेष्टा चालवली आहे? सगळ्या घटनेत भाजपाचा हात असल्याचे म्हणतात, मग तुम्ही तीन पक्ष समर्थ आहात, तुम्ही मिळून भाजपाचा हात कापून काढा. तुम्हाला कुणी अडवले आहे? पण तुम्हाला ते जमत नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही दुबळे आहात, आणि आम्ही श्रेष्ठ, असेही पाटील म्हणाले.

मुसलमानांवर काठ्या का उगारल्या नाही?

या आंदोलनाला सरकार का थांबवत नाही? कारण जर सरकारने तसा प्रयत्न केला, तर त्यांची पदे जातील. राज्याचे माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत. एक गृहमंत्री आता आजारातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री तर हॅास्पिटलमध्ये आहेत. पण बाहेरुन सरकार चालवणारे आहेत ना, असेही पाटील म्हणाले. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत, ही तर परंपराच आहे. आंदोलन करा पण, शांततेत करा. अमरावतीचा कालचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचे कार्यालय फोडले गेले नाही? सामान्य माणसाचे ऑफिस फोडले गेले नाही? पण,आज बंदवर पोलिस लाठ्या चालवतील. काल ज्यांनी दुकाने फोडली त्यांच्यावर लाठ्या चालवल्या नाहीत, अशा शब्दांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.