संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीच्या मंडावली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. संजय राऊतांविरोधात कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अपशब्द वापरले होते. त्यात महिलांबाबतही चुकीचे शब्द होते. त्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरच चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘चुकीचे विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावे’, असे पाटील म्हणाले आहेत. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
काय म्हणाले पाटील?
एखादं वक्तव्य केले आणि ते चुकीचे असेल, तर होणाऱ्या कारवाईची पण तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे त्यांनी वापरलेला तो शब्द चुकीचा आहे की नाही, ते त्यांनी आता पोलिसांना किंवा न्यायालयात सांगावे, असेही त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.’
जीवाचा खेळ चालवलाय
पाटील पुढे म्हणाले, या सरकारने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटला त्याची पाळेमुळे थेट मंत्रालयात आहेत. हे सरकार सगळ्यांच्या जीवाशी खेळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नुकसान भरपाई या सर्वांच्या जीवनाशी हे सरकार खेळत आहे.
( हेही वाचा: ‘व्हॉट्सअॅप चॅट’चे स्क्रीन शाॅट काढताय…तर सावधान! )
Join Our WhatsApp Community