-
प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा सत्तेत सहभागी होण्यास उत्सुक आहे, परंतु त्यांना कोणीही स्वीकारत नाही, असा गौप्यस्फोट भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. या परिस्थितीमुळे संजय राऊत सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असल्याचा दावाही पाटील यांनी केला. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उबाठाला उमेदवार मिळणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
(हेही वाचा – Ambedkar Jayanti 2025 : सावरकर आणि आंबेडकर – विचार आणि कार्यातील साम्यता)
पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचं आहे, पण त्यांना एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येण्यासाठी कोणी संधी देत नाही. यामुळेच राऊत अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करतात.” अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील ५०० पानी पुस्तक लिहिल्याचा उल्लेख करत पाटील यांनी राऊत यांना त्याचा अभ्यास करण्याचा सल्लाही दिला.
(हेही वाचा – Indian Air Force : हवाई दलाचे विमान हवेत असतानाच मोठा हल्ला ; म्यानमारला मदत नेत असताना…)
दरम्यान, संजय राऊत यांनी पाटलांच्या (Chandrakant Patil) वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले, “सत्तेसाठी आम्ही अमित शाह यांचे पाय चाटणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा स्वाभिमानाने लढेल.” मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा स्वबळावर लढणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेना उबाठा आणि महायुती यांच्यातील वाढता तणाव मुंबईच्या राजकारणात नवे वाद निर्माण करू शकतो. शिवसेना उबाठाची सत्ता आणि प्रभाव टिकवण्याची लढाई आगामी निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community