सध्या महाविकास आघाडी आणि विरोधक यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांकडून अनेकदा केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तारखा देखील दिल्यात. मात्र त्यांचे भाकित फोल ठरल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले. यानंतर चंद्रकांत पाटील यांचं सरकार कोसळण्याबाबतची विधानं सुरूच आहे. आता पुन्हा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी आशावाद व्यक्त केला आहे. माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल आशावाद व्यक्त करणे यामध्ये काय चूक आहे? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – राज ठाकरे पुण्यातूनच होणार औरंगाबादकडे रवाना)
पुढे चंद्रकांतदादा असेही म्हणाले की, येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६१ ची कार्यक्रम होईल. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
Join Our WhatsApp Community