खासगी महाविद्यालयातील फी वाढीच्या विषयावरुन पालकांकडून अनेकदा तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे याबाबत आता राज्य सरकारकडून पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
खासगी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आकारण्यात येणारी फी ही न परवडणारी असते. प्राध्यापकांचे पगार देण्यावर पैसे खर्च होत असल्याने ही फी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या प्राध्यापकांच्या पगाराचा खर्च राज्य सरकार करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे खासगी महाविद्यालयांकडून कमी फी आकारली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
13 हजार कोटी रुपये खर्च
सध्या प्राध्यापकांच्या पगारावर हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहेत. खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या पगारावर खर्च करायचा ठरवला तर अजून हजार कोटी रुपये जास्त द्यावे लागतील. त्यामुळे 13 हजार कोटी रुपयांत सर्व प्राध्यापकांचे पगार देता येतील, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community