राज्यात प्रथमच भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पार पडला. मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. यावेळी चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार तसेच, 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार. अशी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. (chandrakant patil)
नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा… pic.twitter.com/DHpt4KnpXW
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 11, 2024
चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, “दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात.” (chandrakant patil)
(हेही वाचा-Dasara 2024 : विजयादशमी का साजरी केली जाते ?; जाणून घ्या या सणाचे महत्त्व)
“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे. मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत.” (chandrakant patil)
(हेही वाचा-Shikhar Savarkar Puraskar : उदयोन्मुख गिर्यारोहक इंद्रनील खुरंगळे यांचा ‘युवा साहस पुरस्कारा’ने गौरव)
“जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे. माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी केल्या.” असं चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community