यंत्रमाग उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणार – चंद्रकांत पाटील

89

कृषी क्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

( हेही वाचा : पीएमपीएमएल बससाठी ईव्ही चार्जिंग सुविधा)

रोजगार निर्मिती होण्यास मदत

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शितल उगले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्यातील सूतगिरण्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहेत. काही बंद आहेत, तर काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या सर्व सूतगिरण्यांबाबत नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत प्रत्येक सूतगिरणी नुसार विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या सूतगिरण्या सुरू राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. काही टेक्सटाईल पार्कला भेट देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.