देशातील सर्व विरोधी पक्षांची आज बिहारच्या पाटण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे नेतृत्व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार करत आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे बिहारला गेले आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत घराणेशाहीवरही भाष्य केलं आहे. नेते मंडळी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आल्याचा प्रहार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. “सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्यची चिंता आहे म्हणून ते एकत्र आले आहेत,” असाही टोला त्यांनी लगावला आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना ईडीचे समन्स; २६ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश)
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
ही नेते मंडळी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आली आहे. “सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्यची चिंता आहे म्हणून ते सगळे एकत्र आले आहेत. भाजप विरोधात विरोधक पाटण्यात एकत्र आले असले तरीही विरोधकांची ही वज्रमूठ सैल करण्याचं काम १४० कोटी जनता करेल. असं म्हणत “विरोधकांनी आज एकत्र येऊन मूठ बांधली असली तरी देशाची जनता ओळखून आहे. मला वाटतं २०२४ मध्ये संपूर्ण एनडीए ४०० पेक्षा जास्त जागांवर यश मिळवेल, हा मला विश्वास आहे.” अशा भाषेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनी टीका केली आहे.
‘हे’ नेते उपस्थित
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही विरोधकांची बैठक बोलावली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी खासदार राहुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सु्प्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तसेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अन्य विरोधी नेते उपस्थित आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community