चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौ-यावर; म्हणाले बारामती जिंकणारच…

156

2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 2024 ला आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढून बारामती लोकसभा जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे हे बारामती दौ-यावर आहेत. बारामतीत आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण या पूर्णवेळ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यांत सीतारमण या पाच ते सहा वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. प्रत्येकवेळी त्या तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणची विकासाची काय स्थिती आहे. केंद्राकडून काय विकासाची अपेक्षा आहे, राज्य सरकारकडून या या ठिकाणी काय करता येईल, याचा आढावा त्या घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. गरिब कल्याणाच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांचादेखील सीतारमण आढावा घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेच शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा महाराष्टात चांगले प्रदर्शन करेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा: ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर कोयत्याने जीवघेणा हल्ला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.