बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली; Chandrasekhar Bawankule यांचा हल्लाबोल

214
बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली; Chandrasekhar Bawankule यांचा हल्लाबोल
बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली; Chandrasekhar Bawankule यांचा हल्लाबोल

दिंडोरी आणि नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचा विकास करीत आहेत. दुसरीकडे ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई लुटली, असा आरोप बावनकुळे यांनी केला. (Chandrasekhar Bawankule)

महाविकास आघाडीचे नेते हरलेल्या मन:स्थितीत

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, “उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले असून, ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. सध्या त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महापालिकेची लूट केली असून, चोरांचे सरदार कोण आहेत, ते राज्याने पाहिले आहे. महाविकास आघाडीचे नेते हरलेल्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे माणूस जेव्हा हरतो, तेव्हा असे विधान करतो.” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (Chandrasekhar Bawankule)

ठाकरे आपल्या उंचीपेक्षा अधिक बोलत आहेत

“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व सोडले नसते, काँग्रेससोबत गेले नसते, तर त्यांना नैराश्य आले नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली आहे. एका विशिष्ट समाजाची मते हवी असल्याने भगव्या ध्वजाला ठाकरे आता फडके म्हणतात. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे आपल्या उंचीपेक्षा अधिक बोलत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत. ठाकरे यांच्या मागण्या पंतप्रधान मोदी नक्कीच पूर्ण करतील.” असा दावाही बावनकुळेंनी केला. (Chandrasekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.