Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर भाजपही आपली मर्यादा सोडेल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

164
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर भाजपही आपली मर्यादा सोडेल
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर भाजपही आपली मर्यादा सोडेल

हिंगोली येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर व भाजप पक्षावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे भाजप नेते संतप्त झालेले आहेत. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर भाजप आपली मर्यादा सोडेल. मुंबईत ईट का जवाब पत्थर से देऊ, मुंबईत असा उद्रेक होईल की तो आम्ही रोखू शकणार नाही, असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.

हिंगोली येथे उद्धव ठाकरेंची रविवारी ( २७ ऑगस्ट) सभा पार पडली. त्यांच्या भाषणावर संतप्त टीका खाताना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होता. पुढे बोलताना ते म्हणाले की , म्हणाले, मी कुणाला इशारा देऊ इच्छित नाही, पण ते लोक ज्या पद्धतीने वागत आहे, ते त्यांनी सोडावे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सक्षमपणे सांभाळत इतिहासात नोंद होईल, असे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या मनात जी उंची गाठली आहे, ती उंची कधीच कमी होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे जन मानसातून मोठे झाले नाही तर सोन्याच्या चमच्याने बदामाचे दूध पिऊन मोठे झालेले आहेत. अडीच वर्षे सरकार चालवून देवेंद्र फडणवीसांसारखी उंची मी गाठू शकलो नाही, याची खंत उद्धव ठाकरेंना असेल. म्हणूनच ते गलिच्छ भाषेत, खालच्या स्तरावर जाऊन फडणवीसांबाबत बोलत आहेत. असे करून त्यांची उरली सुरली उंचीही ते कमी करून घेत आहेत.

(हेही वाचा : Pune Metro : गणपतीत मेट्रो १२ वाजेपर्यंत सुरु ठेवा)

मुंबई मध्ये उमटतील पडसाद
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीसांवर अशाच खालच्या भाषेत टीका केल्यास एखाद्या वेळी एवढा मोठा उद्रेक होईल की मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि आम्हीही ते रोखू शकणार नाहीत. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. देवेंद्र फडणवीस जपानला उद्धव ठाकरेंप्रमाणे आराम करण्यासाठी गेले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सर्वज जण राज्यातील शेतकऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.