मी मोदींचा नाही, व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करण्यासाठी एकत्र या बोललो. हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
ट्वीट करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचे कोण आहे? तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्राने बघितले आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणे यांना तुरुंगात टाकले, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केले म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणे, याला हुकूमशाही म्हणतात. तुमच्या विरोधात बोलले म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणे याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचे घर तोडणे याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मोदीजींना हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा. राहिला प्रश्न ‘जय बजरंगबली’ नारा देण्याचा तर आम्हाला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंगबली’ जयघोष करण्याचा अभिमान आहे.’
उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? तुमच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रानं बघितलं आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणेजी यांना तुरुंगात टाकलं, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं, याला हुकूमशाही…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 4, 2023
(हेही वाचा – कर्नाटकात भाजपाचेच सरकार येणार – देवेंद्र फडणवीस)
‘आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत’
पुढे बावनकुळे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून तुम्हाला मात्र हिंदुत्वाचा विसर पडला आहे. रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधे ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली’चा नारा दिल्यावर दुःख वाटणे साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community