राहुल गांधींच्या मुंबईतील सभेआधीच कॉंग्रेसमधील बडे नेते भाजपात दाखल झालेले असतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. राहुल गांधीची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ नंदुरबारमध्ये दाखल झाली तसेच नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि कॉंग्रेसनेते पद्माकर वळवी भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी नुकतीच बावनकुळेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप होणार, असे मतही बावनकुळेंनी व्यक्त केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे. म्हणून ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज आहे. या प्रवासात राहुल गांधींना गिफ्ट काय मिळणार, तर कॉंग्रेस नेते पक्ष सोडणार आहेत. राहुल गांधींची यात्रा जसजशी शिवाजी पार्कजवळ येईल, तसतसे कॉंग्रेस नेते पक्ष सोडतील, कॉंग्रेस कमजोर झाली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे.
(हेही वाचा – Hotels In Jaipur City: जयपूर शहरातील कुटुंबस्नेही हॉटेल्स कोणते, जाणून घ्या)
नेहमी संभ्रमाचं राजकारण…
ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे लिस्ट आली आहे. पद्माकर वळवी हे नेते असून त्यांनी माझी भेट घेतली आहे. मंगळवारी नंदुरबारमध्ये राहुल गांधींचे नेते मला भेटायला आले. त्यामुळे मला तिथे काय सुरू आहे, हे मला कळतं. राहुल गांधी काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतात. कॉंग्रेसचे हे नेहमी संभ्रमाचं राजकारण करत आलंय, राहुल गांधींच्या बोलण्याला काही अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न
मनोज जरांगे-पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत आहेत. देवेंद्रजींनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. मराठा समाजानेही हे समजून घेतलं आहे. फडणवीसांबद्दल बोलून संभ्रम पसरवण्याचं काही लोकं काम करत असल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community