Chandrashekhar Bawankule : मग त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी‘ म्हणायचे का? – बावनकुळे

259
Chandrashekhar Bawankule : मग त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी‘ म्हणायचे का? - बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : मग त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी‘ म्हणायचे का? - बावनकुळे

समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. अपघात कधीही घडू शकतो, हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत विरोध करताना शरद पवार यांनी खालची पातळी गाठली. “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला”. मग यांच्या सत्ताकाळात घडलेल्या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

बावनकुळे म्हणाले, समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत. वेळेची बचत होत आहे. देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. हे माहित असूनही, देवेंद्र फडणवीसांचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी शरद पवार यांनी गाठली. समृद्धी महामार्गावरील अपघाताबद्दल मत मांडताना त्यांनी कळस गाठला. “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला”, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताचा राज्यपालांनी व्यक्त केला शोक)

मग पवारसाहेब, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले. गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही. या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का? पवारसाहेब, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले. पवारसाहेब, तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.