Chandrasekhar Bawankule : अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल – चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रयान मोहीमेबद्दल आनंद साजरा होत असताना उद्धव ठाकरेंना पोटदुखी

124
Chandrasekhar Bawankule : अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल - चंद्रशेखर बावनकुळे

आजच्या म्हणजेच शुक्रवार २५ ऑगस्टच्या सामनाच्या अग्रलेखावर भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रयान मोहीमेबद्दल आनंद साजरा होत असताना उद्धव ठाकरेंना पोटदुखीचा त्रास सुरू झाला’ अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे. बावनकुळे यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे (Chandrasekhar Bawankule) आज चंद्रयान मोहीमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. कोविड काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चंद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.

संपूर्ण जगात चंद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही. (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : … तर शरद पवारांनी आम्हाला समर्थन द्यावे; छगन भुजबळांनी वेळ साधली)

कांद्याच्या प्रश्नी देवेंद्रजींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली.

उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.