Chandrashekhar Bawankule : नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका

बावनकुळे पुढे म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुम्ही भाजपाविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका.

209
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार; Chandrashekhar Bawankule यांनी व्यक्त केला विश्वास

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. बावनकुळे यांनी समाज माध्यमावर नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले. (Chandrashekhar Bawankule)

ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल अभद्र बोलून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – RBI: रेपो रेटचा थेट परिणाम बँक कर्जावर कसा होतो; जाणून घ्या…)

पुढे ते म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुम्ही भाजपाविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीने वागू नका. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.