पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असे ठरले होते, असे उद्धव ठाकरे सभेत बोलताना म्हणाले. यालाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, घ्या, जगदंबेची शपथ, वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत” आहात, तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते?”, असा खरमरीत सवालही बावनकुळेंनी उध्दव ठाकरेंना ट्वीटद्वारे उपस्थित केला आहे.
ट्वीटद्वारे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा!! पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत? घ्या, जगदंबेची शपथ!! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत” आहात, तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता!! उध्दव ठाकरेजी, चर्चा तर होणारच!” असा थेट निशाणाही त्यांनी साधला आहे.
(हेही वाचा Congress : आता कॉंग्रेसची बारी! १६ आमदार फुटणार; पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी सुरू)
नेमके काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
अमित शहा आणि माझे ठरले होते. त्यांनी कितीही नाही म्हणू देत, मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, शिवाजी पार्कवर मी हे बोललो आहे. आता पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता, असे ते म्हणाले. पक्षाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या पक्षाचे नाव मी कोणाला देणार नाही. निवडणूक आयोगाचा तो अधिकारच नाही. निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकते, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community