उद्धव ठाकरे यांनी आता यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना मर्यादा ओलांडल्या तर त्यांना भाजपचे कार्यकर्ते घराबाहेर पडू देणार नाही, त्यांचा घरकोंबडा करतील, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बरोबरी करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केली. त्यानंतर उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
(हेही वाचा ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना सुनावले)
उद्धव ठाकरे यांना शेवटचा इशारा
उद्धव ठाकरे यांना भाजपचा हा शेवटचा इशारा असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी आपली मर्यादा ओलांडली तर भविष्यात आम्हाला आमची मर्यादा ओलांडावी लागेल. देवेंद्र फडणवीसची बरोबरी करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नसल्याचे बोचरी टीका केली. बाळासाहेबांचे टाचणीभर ही गुण हे उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. मुलगा म्हणून सोडले तर तर उद्धव ठाकरे यांच्याकडे ना बाळासाहेबांचे विचार आहे, ना त्यांच हिंदुत्व आहे, ना तसं कर्तृत्व आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community