खुशाल चौकशी करा, पण महिनाभरात निकाल द्या! काय म्हटले बावनकुळे?

103

गेली अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चौकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, अशी मागणी राज्याचे माजी उर्जामंत्री, भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

चौकशीचा ठपका

ऊर्जा मंत्रीपदाच्या काळातील कामांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून यासंदर्भात त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा, असे बावनकुळे म्हणाले. या चौकशीमागे खाजगीकरणाचा वास येत असल्याचा संशय व्यक्त केला. चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील १६ शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा, असा या मागचा प्रयत्न असू शकतो, देवेंद्र फडणवीस सरकारने लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र केला. एक शेतकरी – एक डीपी योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखवला. आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली. आमच्या सरकारनेच एलीफेंटाला वीज पोहोचवली. राज्यातील ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन मिळवून दिले. ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज दिली असल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

(हेही वाचा निधी वाटपात सरकारमधील तीन पक्षांत भेदभाव…फडणवीसांच्या टिकेला अजित पवारांचे उत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.