पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या जनकल्याणाच्या विविध योजना व विकासाची गॅरंटी ही भाजपा कार्यकर्त्यांना मते मागण्यासाठी पुरेशी आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे (Chandrashekhar Bawankule) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सत्तेचा वापर जनकल्याचे साधन म्हणून व्हावा.
धार्मिक विषयावरून भाजपाला मते मागण्याची गरज नाही –
नाशिक प्रवासात पंचवटी येथील काळाराम मंदिरात प्रभू श्री रामाची महाआरती केल्यावर ते माध्यमांशी संवाद साधत होते. २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यावरून जे लोक राजकारण करीत आहे, त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो, असा टोला लगावताना धार्मिक विषयावरून भाजपाला मते मागण्याची गरज नाही. आम्ही रामाचे सेवक म्हणून देशाचे व महाराष्ट्राचे हित जोपासण्याचे काम करीत आहे. समाजातील अखेरच्या व्यक्तिंच्या कल्याणसाठी आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत, असेही त्यांनी (Chandrashekhar Bawankule) सांगितले.
(हेही वाचा – Karti Chidambaram यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस; पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याबद्दल कारवाई)
• लोकसभा वॉरियर्सशी संवाद
नाशिक प्रवासात बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील १० वर्षांत मोदींनी देशकल्याण व गरीब कल्याणाच्या ज्या योजना राबविल्या, जनसेवेसाठी जीवन अर्पित केले हेच जनतेकडून मतांचे कर्ज घेण्यासाठी पुरेसे आहे. त्यासाठी सर्वांनी दररोज ३ तास पक्षकार्यासाठी द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
• काळाराम मंदिरात महाआरती
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिर आगमनाच्या पावन पर्वावर नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भेट दिली. शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबतीने त्यांनी प्रभू श्रीरामाची महाआरती केली. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारतीताई पवार, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, स्थानिक आमदार, पदाधिकारी सहभागी झाले होते.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : मंदिरासाठी ‘१४ सुवर्ण जडीत’ दरवाजे होत आहेत तयार)
• हिमाचल प्रदेशातील नागरिकांची भेट
काळाराम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या हिमाचल प्रदेशातील महिला-पुरुषांशी यावेळी भेट झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रदेशातून आलेल्या या महिलांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारमुळे महिलांचे जीवन सुकर झाल्याचा आनंद त्यांनी (Chandrashekhar Bawankule) व्यक्त केला हिमाचलची लोकगीते त्यांनी आम्हा सर्वांसमोर सादर केले. प्रभू श्री रामाच्या मंदिरात झालेला हा संवाद आनंद देणारा ठरला. (Chandrashekhar Bawankule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community