Chandrashekhar Bawankule : हरियाणातील ऐतिहासिक विजयाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार….; चंद्रशेखर बावनकुळे यांना ठाम विश्वास

60
Chandrashekhar Bawankule : हरियाणातील ऐतिहासिक विजयाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार....; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाम दावा
Chandrashekhar Bawankule : हरियाणातील ऐतिहासिक विजयाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार....; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाम दावा

हरियाणा मध्ये भाजपने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार, महायुतीचा प्रचंड विजय होणारच असा ठाम दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला.लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडल्याची बोचरी टीकाही बावनकुळे यांनी यावेळी केली.

( हेही वाचा : Netflix विरोधात निर्मात्याची आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार, अधिकाऱ्याची ६ तास चौकशी

बावनकुळे म्हणाले की,हरियाणामध्ये भाजपाची सत्ता स्थापन होत असून जम्मू – काश्मीरमध्येही भाजपाला मोठे यश मिळाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती.मात्र आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे.याला कारण मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने भरभरून भाजपाच्या पारड्यात मतदान केले म्हणून हरियाणा,जम्मू – काश्मीरमध्ये इतके मोठे यश मिळाले असाही दावा त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधी यांचे अमेरिकेतील आरक्षणा बाबतचे वक्तव्य ऐकल्यानंतर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आल्याने आता आपल्या जीविताचे, मालमत्तेचे तसेच संविधानाचे रक्षण केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळेच महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटणार आहेत.राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मतदारही महायुतीला विजय प्राप्त करून देतील,आणि विरोधकांचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडण्यासाठी ‘भाजपा घर चलो अभियान’ राबविणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आता आगामी विधानसभा निवडणूका पाहता भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचून काँग्रेसने निर्माण केलेला संभ्रम दूर करून राज्य आणि केंद्र सरकारची विकासकार्ये पोहोचवेल.तसेच विरोधकांचेही जातीपातीचे राजकारण हद्दपार करून सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहील.आणि आता आत्मपरिक्षणाची वेळ आता काँग्रेसवर आली आहे.मात्र भाजपाला विजयाचा उन्माद नाही की पराजयाने आम्ही खचत नाही,सतत अंत्योदयाच्या भावनेने भाजपा कार्य करत असल्याचेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठामपणे नमूद केले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.