मारकडवाडीत (Markadwadi) गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमविरोधात विरोधकांचे रडगाणे सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) शरद पवार यांनी मारकडवाडीत सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना टिका केली. परंतु मारकडवाडीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांच्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. बावनकुळे म्हणाले, शरद पवारांनी लक्षात घ्यावे की मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा, असे ही बावनकुळे यांनी ट्विटवर लिहले.
( हेही वाचा : लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर Waqf Board चा दावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अन्याय…)
बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.(Markadwadi)
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली.(Markadwadi)
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Patil ) यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते (Ram Satpute) यांना १००३ मतं मिळाली. (Markadwadi)
या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल, अशी टीका ही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पवारांवर केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community