राहुल गांधींनी २०२९ ला माझ्याविरोधात विधानसभा लढवावी; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचे खुले आव्हान

106
राहुल गांधींनी २०२९ ला माझ्याविरोधात विधानसभा लढवावी; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचे खुले आव्हान
राहुल गांधींनी २०२९ ला माझ्याविरोधात विधानसभा लढवावी; मंत्री Chandrashekhar Bawankule यांचे खुले आव्हान

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कामठी विधानसभेतून (Kamthi Assembly constituency) २०२९ ची निवडणुक माझ्या विरोधात लढवावी, असे खुले आव्हान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी त्यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केले.(Chandrashekhar Bawankule)

( हेही वाचा : ‘…कर्जत जामखेडला न्याय द्या’; Rohit Pawar यांच्या मतदारसंघातील पोस्टरची चर्चा)

मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की,”काँग्रेसने (Congress) कधीही विकासाचा मार्ग धरला नाही. दिल्लीचा निकाल हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा विजय आहे. कारण देशाचा विकास डबल इंजिन सरकारच करू शकते, हे देशाच्या जनतेलाही माहिती आहे. जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात विकास दिसत असल्याने देशाच्या ७५ टक्के भूभागावर भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. दिल्लीचा हा विजय २७ वर्षांनंतरचा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला मते दिली ती अपेक्षा मोदीजीच पूर्ण करु शकतात, हा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या विकासाच्या संकल्पपत्रावर जनतेने आम्हाला मते मिळाली.”(Narendra Modi) (Chandrashekhar Bawankule)

दरम्यान उद्या किंवा परवा दिल्लीमध्ये ईव्हीएम (EVM) मशीनबद्दल विधान काँग्रेसकडून (Congress) केले जाईल. तसेच सकाळी ९ वाजताचे महाराष्ट्राचे महान प्रवक्तेसुद्धा बोलायला सुरुवात करतील. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी कामठी विधानसभेवर आक्षेप घेतला होता. पण राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कामठीचा अभ्यास करावा किंवा कधीतरी तिथून निवडणूक लढवावी. राहुल गांधींनी २०२९ ची निवडणूक कामठी विधानसभेत (Kamthi Assembly constituency) माझ्या विरोधात लढावी, असे आव्हान बावनकुळे यांनी दिली आहे. कामठी विधानसभेत (Kamthi Assembly constituency) २५ वर्षांपासून भाजप जिंकते आहे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) तिथे गडबड झाली असे सांगतात. राहुल गांधी माझ्या विरोधात लढल्यास मी जिंकून दाखवेन. माझी जनता आणि आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि प्रामाणिक आहे. त्यामुळे कामठी विधानसभेविषयी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) बोलू नये. ते माझ्याविरोधात लढल्यास मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही,” असेही (Chandrashekhar Bawankule) ते म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.