
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबद्दल केलेल्या विधानासंदर्भात आता भाजपा आमदार आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवरून संजय राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, उबाठाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही.
( हेही वाचा : IPL 2025 : ‘घरच्या मैदानाचा फायदा मिळावा असं कुणाला वाटणार नाही,’ प्रशिक्षक चंदू पंडित यांचे विधान)
भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपाचे (BJP) नेते अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (Morarji Desai) (८३ वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना (Sanjay Raut) हे आठवणार नाही.
भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community