‘मला विचारल्याशिवाय मीडियाशी बोलू नका’; बावनकुळेंचे भाजपाच्या नेत्यांना फर्मान

226
'मला विचारल्याशिवाय मीडियाशी बोलू नका'; बावनकुळेंचे भाजपाच्या नेत्यांना फर्मान
'मला विचारल्याशिवाय मीडियाशी बोलू नका'; बावनकुळेंचे भाजपाच्या नेत्यांना फर्मान

मला विचारल्याशिवाय मीडियाशी बोलू नका, असे फर्मान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या नेत्यांना सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून भाजप आणि शिवसेनेचे नेते आमनेसामने येताच भाजपने सावध होऊन स्वपक्षाच्या नेत्यांना आवर घालण्याची भूमिका घेतली आहे.

जाहिरातीच्या मुद्यावरून भाजपच्या काही नेत्यांनी उघडपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. त्याला शिंदे समर्थक आमदारांनीही जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे युतीत नव्या वादाला तोंड फुटून राजकीय परिणामांची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपने सावध होऊन स्वपक्षाच्या नेत्यांना आवर घालण्याची भूमिका घेतली आहे. परिणामस्वरूप भाजपच्या नेत्यांना माध्यमांपुढे राजकीय भाष्य करताना प्रदेश नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

(हेही वाचा – पुढील तीन महिन्यांत ३५०० गिरणी कामगार आणि वारसांना घरांचा ताबा; ‘मेंटेनन्स’ आकारणार १ जुलै २०२३ पासूनच)

‘बॅनर’बाजीवर बंधने

जाहिरातीवरून शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केलेल्या भाजपा नेत्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान टोचले आहेत. तसेच फलक उभारण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. नेत्यांच्या बोलण्याने सरकार आणि भाजपा-शिवसेना युतीवर परिणाम होऊन विरोधकांच्या हाती कोलीत जाऊ नये, याकरिता भाजपने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद, वादांवर भूमिका मांडताना नेत्यांना प्रदेश नेतृत्वाची म्हणजे, बावनकुळे यांचीच संमती घ्यावी लागणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.