चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा; म्हणाले…

272
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सोमवारी नागपुरात पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘नागपूरचा कलंक’ असा उल्लेख करत जोरदार टीका केली. यामुळे भाजपा उद्धव ठाकरेंविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून, पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले आहे. त्यापाठोपाठ आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. तसेच बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांचा ‘कलंकित करंटा’ असा उल्लेखही पत्रकारपरिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामांचा पाढा वाचत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे हा ‘कलंकित माणूस’ आहे असेही ते म्हणाले. बावनकुळे इशारा देत म्हणाले, “यापुढे तुम्ही असं काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने मारेल. उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, मेट्रोसारखे प्रकल्प बंद पाडले, हा ‘कलंकित करंटा’ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो, हा ‘कलंकित करंटा’ सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना साथ देतो.” अशा परखड शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत ५६ जणांचा मृत्यू)

पुढे चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंना म्हणाले, “तुमचं संतुलन बिघडलं असेल तर मनोरुग्णालयात जा, नागपुरात मनोरुग्णालय आहे तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता रस्त्यावर आंदोलन केलंय, पुढचं आंदोलन तुम्हाला माहिती नाही कुठं होईल. आमचे लोक तुमच्या गाड्या अवडल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.” असा थेट इशाराच बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.