‘युती टिकवण्याचे गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाहीत; शिवशक्ती-भीमशक्ती युती टिकवतील यात शंका’

83

शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती सोमवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीबाबत चांगली चर्चा रंगली आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या युतीवर जोरदार टीका केली आहे.

‘उद्धव ठाकरे आता शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख’

एका खासगी मराठी वृत्तवाहिनी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना आता लोकशाही कळली आहे. किमान मातोश्रीच्या बाहेर निघायला लागले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांना लोकशाहीपर्यंत आणलं आहे. आजपासून उद्धव ठाकरे शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल. मला असं वाटतं की, जो पक्षप्रमुख आपल्या ४० आमदारांना सांभाळू शकतं नाही, आपलं घर सांभाळू शकत नाही, ते प्रकाश आंबेडकरांसोबत किती दिवस युती चालवतील, यात शंका आहे.’

‘प्रकाश आंबेडकर एकदिवशी कंटाळणार’

‘आता प्रकाश आंबेडकर हे प्रगल्भ नेते आहेत, ते काय निर्णय घेतली हा त्यांचा अधिकार आहे. पण ज्यांना आपलं घर चालवता देत नाही, ते दुसऱ्यांसोबत कधीच मैत्री टिकवू शकतं नाही. प्रकाश आंबेडकर एकदिवशी कंटाळणार. कारण दृष्टीकोन आणि संवादच त्याठिकाणी नाहीये. कारण युती टिकवण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, युती टिकवायला समर्पण लागतं. उद्धव ठाकरेंकडे समर्पण नाहीये, युती टिकवण्याकरीताचे गुणही नाहीत, त्यामुळे ही युती किती दिवस चालेल हे बघावं लागलं’, असं बावनकुळे म्हणाले.

(हेही वाचा – ‘मला याबाबत माहित नाही, मी या भानगडीत पडत नाही,’ शरद पवारांचं शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर मोठं विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.