वाचाळविरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना विरोधकांना दिला. (Chandrashekar Bawankule)
पंकजा मुंडे नाराज नाहीत
चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या की, पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तुत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच. खरं तर पक्ष हा मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे. (Chandrashekar Bawankule)
(हेही वाचा : Ajit Pawar VS Chhagan Bhujbal : भुजबळ पवार संघर्ष नक्की का आणि कधीपासून?)
महायुतीचे 45 प्लस खासदार निवडून येतील
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी लोकसभेच्या कामासाठी आलो आहे. मी त्यावर काम करेल. सुपर वॉरियर्स लोकांच्या घरी जावून मोदींचे कार्य समजावून सांगतील. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल ते बघणार आहोत. मोदी तिसऱ्या वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राज्यात महायुतीचे 45 प्लस खासदार निवडून येतील.
हेही पहा –