मी तोंड उघडले तर देशमुख निरुत्तर होतील; बावनकुळेंचा इशारा

182
भाजपने अनिल देशमुखांना पक्षात येण्याची ऑफर दिली नव्हती, ते खोटे बोलत आहेत, आपण जर तोंड उघडले तर देशमुख यांना उत्तर देता येणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात जे काही घडले ते मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील, त्यांचे पाय आणखी खोलात जातील. अनिल देशमुखांना भाजपाची काय गरज होती का, ते आम्ही वेळ आल्यावर सांगू, असेही बावनकुळे म्हणाले. माझी अनिल देशमुखांना सूचना आणि विनंती देखील आहे की, ते जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत याचे त्यांनी भान ठेवावे, असा  टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान देशमुखांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दुजोरा दिला. देशमुखांना ‘तुम्ही पक्ष बदला, विचार बदला आणि नेतृत्त्व बदला. परंतु देशमुख यांनी तुरुंगात जाण्याची तयारी दाखवली आणि पक्षाची साथ सोडणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.