चंद्रयान लाँच झाले पण १० वर्षे रस्त्यावर फिरूनही Rahul Gandhi झाले नाहीत लाँच; Eknath Shinde यांचा घणाघात

174
चंद्रयान लाँच झाले पण रोडवर फिरून देखील गेल्या दहा वर्षात राहुल गांधी (Rahul Gandhi) लाँच झाले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता. मात्र आता केवळ मोदींचा पॅटर्न चालत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. लातूरमध्ये महायुतीचे उमदेवार सुधारक श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता. मात्र, दहा वर्षांपूर्वीच जनतेने तो उलटून टाकला, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. इतक्या वर्षात काँग्रेस लातूरचा पाणी प्रश्न सोडवू शकले नाही. त्यांनी सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होऊ दिले नाहीत. मराठवाडा वॉटरग्रीड योजना बंद केली. मात्र, आता नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुन्हा सुरू होत आहे. ही योजना महाविकास आघाडीने गुंडाळून ठेवली होती, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केला आहे. लातूरकरांना दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही अनेक योजना आणल्या आहेत. लातूरकरांना पाण्यासाठी आता वन-वन फिरावे लागणार नाही. लातूर दुष्काळमुक्त करण्यासाठी आता प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मोदींना दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही

देशवासियांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस काम करत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारे आपले पंतप्रधान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मोदींनी लातूरमध्ये रेल्वे कारखाना सुरू केला असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.

मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही

भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्यामुळे मोदींवर आरोप करता येत नाही. त्यामुळे संविधान धोक्यात असल्यासारखे आरोप विरोधक करत आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच एक गरीब घरातील मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकला. आणि आदिवासी समाजाची महिला देशाची राष्ट्रपती होऊ शकली. अशा या पवित्र संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.