Maharashtra Government : राज्याचे नवे मुख्य सचिव कोण? ‘ही’ नावे चर्चेत

२९ एप्रिलपासून राज्याचे मुख्य सचिव पद रिक्त राहणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक यांचा या पदावर दावा असेल.

250

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या २८ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी ‘आयएएस’मधून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. महाराष्ट्र सरकारमधील Maharashtra Government उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.

मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुदतवाढ न मागता, पाच वर्षांचा कालावधी असलेल्या सेवा आयुक्तपदासाठी अर्ज करून तेथे निवडले गेले आहेत. त्यामुळे २९ एप्रिलपासून Maharashtra Government राज्याचे मुख्य सचिव पद रिक्त राहणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक यांचा या पदावर दावा असेल.

(हेही वाचा Shivsena On Ajit Pawar: लवकरच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार: शिवसेना नेत्याचा दावा)

सुजाता आणि मनोज सौनिक नात्याने पतिपत्नी आहेत. दोघे अधिकारी सेवाज्येष्ठतेत वरचे असले, तरी महाराष्ट्राबाहेरचे आहेत. त्यामुळे डॉ. नितीन करीर यांना संधी मिळू शकेल, अशा चर्चा आहेत. प्रशासनातील विविध प्रयोगांमुळे कायम सर्व राजवटींना प्रिय वाटणारे डॉ. करीर हे २०२४ मध्ये निवृत्त होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.