Chhagan Bhujbal राष्ट्रवादीपासून दूर ? पक्षात दरी वाढल्याची चर्चा

61
Chhagan Bhujbal राष्ट्रवादीपासून दूर ? पक्षात दरी वाढल्याची चर्चा
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि पक्षातील तणाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी रात्री आयोजित केलेल्या आमदारांच्या बैठकीला आणि बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महायुती आमदारांशी संवाद बैठकीला भुजबळ उपस्थित राहिले नाहीत. यामुळे भुजबळ आणि पक्ष नेतृत्वातील मतभेद उघड झाले आहेत.

मंत्रिमंडळातील डावलल्यामुळे नाराजी ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेल्या भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. याविषयी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली नसल्याचे दिसते. मंत्रिमंडळ विस्तारानंतरही पक्षाने त्यांच्याशी संवाद साधला नसल्याचे समजते.

(हेही वाचा – कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतूक व दळणवळण प्रकल्पांना गती; खासदार Dr. Shrikant Shinde यांची आढावा बैठक)

मुख्यमंत्र्यांची भेट आणि पुढील दिशा

भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. मात्र, पक्षाकडून त्यांच्या नाराजीवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही.

गैरहजेरीचे सत्र सुरूच

मंगळवारी रात्री अजित पवारांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत भुजबळ (Chhagan Bhujbal) गैरहजर होते. बुधवारी पंतप्रधान मोदींच्या महायुती आमदारांसाठीच्या बैठकीलाही त्यांनी अनुपस्थिती दर्शवली. मंत्री धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ यांनी परवानगी घेऊन गैरहजेरी लावली होती, परंतु भुजबळ यांनी अनुपस्थितीबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे समजते.

(हेही वाचा – BCCI Code of Conduct : बीसीसीआयची खेळाडूंसाठी १० कलमी आचारसंहिता)

तटकरे-भुजबळ संवाद अपयशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा केला होता. तटकरे यांनी त्यांना शनिवारी व रविवारी होणाऱ्या पक्ष शिबिरात सहभागी होण्याची विनंती केली. मात्र, भुजबळ यांनी यावर कोणताही ठोस प्रतिसाद दिला नसल्याचे समजते.

भुजबळांची पुढील भूमिका स्पष्ट होणार ?

भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी मुंबई मॅरेथॉनच्या कार्यक्रमाला हजेरी लावली असली, तरी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकींना अनुपस्थित राहणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतो का, यावरच पक्षातील तणाव मिटणार की आणखी वाढणार, हे ठरेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.