छगनराव; कोणते महापुरुष भ्रष्टाचार करायला शिकवतात?

121

भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली तुरुंगाची शिक्षा भोगून आल्यानंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या कृपेने मंत्री झाले. गेली दोन वर्षे त्यांच्या छातीत कळ येईनाशी झाली. ते निरोगी आहेत, सुखरुप आहेत ही खरंच आनंदाची बाब आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे ही ईश्वराचरणी प्रार्थना. आता एका कार्यक्रमात छगनरावांनी मुक्ताफळे उधळली आहे. ‘शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

( हेही वाचा : महापालिका कर्मचारी म्हणतात, सानुग्रह अनुदान द्या, पण त्यातून आयकर कापून घेऊ नका!)

छगन भुजबळ बाळासाहेब यांच्या बरोबर होते तोपर्यंत ते हिंदुत्ववादी होते. बाळासाहेबांची सोबत सोडून ते शरद पवारांच्या गटात शिरले आणि ते अचानक जातीयवादी झाले. असे कोणते औषध पवार गटाकडे आहे हे शोधून काढावे लागेल. परंतु राष्ट्रवादीत गेलेले भले नेते देखील हिंदू आणि ब्राह्मणांच्या विरोधात गरळ ओकू लागतात. कदाचित राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी हीच एक महत्वाची अट असावी. असो.

अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. पण, सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी ‘तीन टक्के’ लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची’ हा छगन भुजबळ यांचा प्रश्न आहे.

परंतु छगनराव हे विसरले असतील की ज्या ३% लोकांबद्दल ते बोलत आहेत, त्यांच्यातीलच एका भिडे नामक सत्पुरुषाने महात्मा फुले यांना शाळा सुरु करण्यासाठी आपला वाडा दिला होता. या ३% लोकांनी देसाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे, देशाचे नेतृत्व केले आहे. तसेच इतर समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष देखील केला आहे. टिळक, आगरकर, सावरकर, रानडे अशी अनेक ३% आडनावे सांगता येईल. परंतु ज्या बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर जात न पाहण्याचे संस्कार केले त्या छगनरावांनी जात पाहण्याचे क्लासेस कुठे घेतले हा मूळ प्रश्न आहे.

माता सरस्वतीची उपासना प्राचीन काळापासून सुरु आहे. इतकेच काय तर अनेक देशांमध्ये सरस्वतीची उपासना केली जाते. सरस्वतीची मंदिरे पाहायला मिळतात. सरस्वती ही शक्ती आहे, ज्ञानाची शक्ती… तिची उपासना म्हणजेच ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग. मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, देशाचा असो. सरस्वतीला कुणी अस्पृश्य नाही. परंतु छगनराव यांच्या मनात जातीयवाद इतका रुतला आहे की तो निघता निघत नाही.

त्यांनी अनेक महापुरुषांची नावे देत, ह्यांचे फोटो शाळेत लावायला हवे असे वक्तव्य केले. हे अगदी खरे आहे. या महापुरुषांचे फोटो शाळेत लावायला पाहिजेत, किंबहुना साळामध्ये या महापुरुषांचे असतातही, त्याचबरोबर सरस्वतीचे चित्र देखील असते. पण प्रत्येक गोष्टीत ब्राह्मणांना दूषणे देऊन स्वतःला पुरोगामी समजणारे लोक नेहमी हिंदू देव-देवतांवर घसरतात. इफ्तार पार्टी करताना छगनरावांना असले प्रश्न का बरे पडत नसतील? माझा छगनरावांना एक प्रश्न आहे की त्यांना महापुरुषांमुळे शिक्षण मिळाले. हे सगळे महापुरुष चांगले शिक्षण देत होते. मग छगनरावांना जनतेला लुबाडण्याचे आणि भ्रष्टाचार करण्याचे शिक्षण कोणत्या महापुरुषाने दिले आहे, हे छगनराव स्पष्ट करु शकतील का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.