मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Chhagan Bhujbal) मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. अशातच आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंदापूर येथे भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा भरवण्यात आला होता. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. “माझा हिशोब करणाऱ्यांना दादागिरीनेच उत्तर देणार” असे भुजबळांनी सांगितले.
(हेही वाचा – Allahabad High Court Bollywood Notice : अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना मिळाली नोटीस; जाणून घ्या नेमके कारण काय ?)
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ?
“राज्यात मी (Chhagan Bhujbal) अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे रोज तर मी १५ दिवसांतून एकदा सभा घेतो. त्यामुळे नेमकी कोण अशांतता पसरवत आहे ही तुम्ही ठरवा. २४ तारखेनंतर माझा हिशोब करण्याची भाषा करणाऱ्यांना दादागिरीनेच उत्तर देणार. तसेच मराठा समाजाला दिले ते सर्व ओबीसी यांना द्या. आमचे २७ टक्के आरक्षण द्या मग तुम्हाला हवे ते करा. “
पुढे बोलतांना भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर झुंडशाहीला विरोध आहे. जरांगेसाठी कायदा नाही आहे का? , तुमचा राग माझ्यावर असू शकतो पण तो राग ओबीसींवर काढू नका.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community