निवडणूक आयोगाने शिंदेगट आणि ठाकरे गटाला स्वतंत्र नाव आणि चिन्ह दिले आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाचे नाव मान्य करत मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला दिले. यानंतर आज, मंगळवारी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन मशाल या चिन्हाशी जोडलेल्या आठवणी सांगितल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माझगाव विभागातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि शिवसेनेचे पहिले आमदार देखील झाले, ही एक बाजू असली तरी दुसरी बाजू म्हणजे मशाल या चिन्हावर आमदार झालेल्या भूजबळांनी नंतर शिवसेनेत बंडखोरी केली आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले होते.
(हेही वाचा – मुंबई ते उरण फक्त ३० मिनिटांत प्रवास; मोरा जेट्टीच्या कामाला १५ दिवसांत होणार सुरूवात)
उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह दिल्यानंतर या चिन्हासोबतचे शिवसेनेचे जूने नाते चर्चेत आले आहे. १९८५ मध्ये भुजबळांनी या निवडणूक चिन्हावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांना विजयही मिळाला.
भुजबळांनी सांगितला किस्सा
मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. मुंबई महाराष्ट्रात आहे पण ती दिसत नव्हीत. त्यावेळी पक्ष वैगेरे काही नव्हतं. १९७८ मध्ये मी शिवसेनेचा गटनेता झालो. आमचा गट छोटा होतो त्यातून १८ जण महापालिकेत निवडून आलो होतो. आमदार कोणी नव्हतं. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर २ महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत बाळासाहेबांनी बरेच उमेदवार उभे केले होते. आमच्या पक्षाकडे चिन्ह नव्हतं. त्यावेळी माझं चिन्ह मशाल होतं. शिवसेनेचं चिन्ह वाघ समजायचो तो काढायला कठीण होता. मशाल लगेच भिंतीवर काढता येत होती. प्रचारादरम्यान, शिवसैनिकांनी हातात मशाल घेऊन मते मागण्यास सुरूवात केली. या निवडणुकीचा निकाल लागल्यावर शिवसेनेतून मी एकटाच निवडून आलो. बाकी सगळ्यांचा पराभव झाल्याचे भूजबळांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत मशाल चिन्ह अनेकांनी घेतले. मला महापालिकेत उभे केले. ७४ नगरसेवक निवडून आले. बाळासाहेबांनी मलाच महापौर केले. मी एकाचवेळी आमदार आणि महापौर असलेला पहिलाच, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
Join Our WhatsApp Community