Chhagan Bhujbal यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; अजित पवार म्हणतात, हा पक्षांतर्गत प्रश्न

57
Chhagan Bhujbal यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; अजित पवार म्हणतात, हा पक्षांतर्गत प्रश्न
Chhagan Bhujbal यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; अजित पवार म्हणतात, हा पक्षांतर्गत प्रश्न

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ अजित पवार यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यांनी नागपूर येथील अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठत ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेत आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या मेळाव्यांतून अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत, तर शरद पवार यांच्याविषयी चांगले बोलत आहेत. २३ डिसेंबर या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या वेळी समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

(हेही वाचा – मुंबईतील BAPS Shri Swaminarayan Mandir मध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात?)

या भेटीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भुजबळ यांना ८-१० दिवसांत यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीबाबत अजित पवार यांनी अनेक दिवस मौन बाळगले होते. मंत्रीमंडळात काही मान्यवरांना थांबायला सांगितले, तर काहींनी रोष व्यक्त केला. वास्तविक कधी कधी नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते. इथे संधी न देता केंद्रात संधी देण्याचा आपण विचार केलेला आहे. त्यांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, तो देण्यासाठी अजित पवार तसूभर कमी पडणार नाही. पण याबाबत गैरसमज करून वेगळी भूमिका घेणे बरोबर नाही. राज्यात कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आजही त्यांनी ही पक्षांतर्गत प्रश्न असल्याचे सांगून विषय संपवला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.