छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रविवारी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आपल्या या भाषणानंतर सोमवारी भुजबळ हे शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. भुजबळ यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय? असे विचारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शरद पवार यांची भेट ही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आता छगन भुजबळ यांचा संपूर्ण ताफा सिल्हर ओकवर पोहोचला आहे. भुजबळ यांच्या या अचानक भेटीनंतर आता अजित पवार यांच्यात काय पडसाद उमटणार? असे विचारले जात आहे.
… तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची तब्येत ठिक नाही. ते कोणाचीही भेट घेत नाहीत. तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. भुजबळ वेळ न घेताच सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. पवारांकडून मिलिंद नार्वेकरांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आला होता. (Chhagan Bhujbal)
काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या गटात जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर नाही ना? असे आता विचारले जात आहे. (Chhagan Bhujbal)
छगन भुजबळ भाषणावेळी नेमकं काय म्हणाले ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 14 जुलै रोजी जाहीर सभा झाली होती. या सभेत छगन भुजबळ जोरदार भाषण केले होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. (Chhagan Bhujbal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community