Chhagan Bhujbal जाणार राज्यसभेवर?

282
Chhagan Bhujbal जाणार राज्यसभेवर?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झालेले असून नाराज भुजबळांची वर्णी आता थेट राज्यसभेवर लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. छगन भुजबळ यांनीच माध्यमांना आपल्याला राज्य सभेवर पाठवण्याचा विचार पक्षाचा असून राज्य सभेचे सदस्य नितीन जाधव पाटील यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी आपली वर्णी लावण्याचा विचार पक्षाचा असला तरी मला तिथे जाण्यास स्वारस्य नाही. जिथे मान आहे, तिथे सोन्याचा पान दिला तरी उपयोग नसतो, अशा शब्दांत भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal नाराज अन् अजित पवार २४ तासांपासून नॉट रिचेबल; नेमक घडतंय काय?)

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपदावरून डावल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून मंत्रिपदे मिळतात आणि जातात, आजवर मी अनेक उपमुख्यमंत्रीपदापासून अनेक मंत्री पदे भुषवली आहेत. त्यामुळे मंत्रीपदासाठी मी आग्रही नसलो तरी पक्षात ज्याप्रकारे वागणूक दिली जाते हे मला खटकते असे ते म्हणाले. मागील लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकमधून मला उमेदवारी निश्चित मानली जात होती, पक्षाकडून मला सांगितले जात होते. परंतु एक महिना मला पक्षाच्या नेत्यांकडून लटकवत ठेवल्यामुळे अखेर मी माघार घेतली. त्यानंतर राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांना पाठवण्याच्या वेळी मी इच्छा प्रकट केली होती. केंद्रात जाऊन मी आपली भूमिका मांडू शकतो, असे मी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. परंतु, आपली राज्यात गरज असल्याचे सांगत मला राज्यसभेवर पाठवले नाही.

(हेही वाचा – MVA सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न; चौकशीसाठी सरकारने नेमली एसआयटी)

त्यानंतर ओबीसी मुद्द्यावरूव बीडमध्ये घरे पेटलेली असताना मी एकटा तिथे पोहोचलो. ओबीसीचा मुद्दा लावून धरला, त्यामुळे जरांगे माझ्या विरोधात गेले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मला पाडण्याच्या खूप प्रयत्न झाला. जरांगे पाटील आणि खुद्द शरद पवार हे मला पाडण्याचा प्रयत्नात असतानाही मी निवडून आलो. भलेही मताधिक्य ३० हजारांनी कमी झाले. पण त्यानंतरही मी निवडून आलो. मी एक ज्येष्ठ नेता, ज्येष्ठ मंत्री असतानाही मला मंत्रीपदावरून डावलले जात असल्याने मतदारांमध्ये नाराजी पसरलेली आहे. मंत्रीपदी मला डावलले आणि मकरंद जाधव पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे. त्यामुळे राज्य सभेवरील त्यांचे बंधू नितीन जाधव पाटील यांना राजीनामा द्यायला लावून मला राज्यसभेवर पाठवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेव्हा मी राज्य सभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो, तेव्हा माझी संधी नाकारली आणि जेव्हा मी आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा मंत्रीपदी नाकारुन मला राज्यसभेवर पाठवले जाते, हे पक्षातील वागणूक मला खटकणारी आहे, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलतांना एका मुलाखतीत व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.