राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet) स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर सोमवारी (१६ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावललं त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत.” असं भुजबळ माध्यमांना म्हणाले.
हेही वाचा-Maharashtra Cabinet : राज्यातील ‘हे’ १७ जिल्हे मंत्रीपदापासून वंचित! वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
तुम्हाला पक्षाने, महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदापासून का डावललं? या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं.” (Chhagan Bhujbal)
हेही वाचा-One Nation One Election विधेयक लोकसभेत स्थगित; राज्यसभेत होणार दोन दिवस विशेष चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवारांच्या अभिनंदनाचे, नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग ठिकठिकाणी लागले आहेत. त्यावर भुजबळांचा फोटो छापलेला नाही. त्यावरून भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कधी कधी होर्डिंगवर जागा नसते.” दरम्यान, त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही पक्षावर नाराज आहात का? यावर भुजबळ म्हणाले, “होय, मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे.” (Chhagan Bhujbal)
हेही वाचा-शस्त्र सोडा आणि मुख्य प्रवाहात या; Amit Shah यांचा नक्षलवाद्यांना इशारा
तुमचं अजित पवार (Ajit Pawar), सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणं झालं आहे? यावर भुजबळ म्हणाले, “मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही.” मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले, “मी माझ्या लोकांशी बोलेन, माझ्या मतदारसंघातील जनतेशी, माझ्या कार्यकर्त्यांशी, समात परिषदेतील लोकांशी बोलून पुढची भूमिका ठरवेन.” भुजबळांना आता शरद पवारांकडे जाणार का? असा प्रश्न देखील यावेळी विचारला, त्यावर ते म्हणाले, “मी १२ डिसेंबर रोजी शरद पवारांना भेटून आलो आहे.” (Chhagan Bhujbal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community