राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan Scam) २ वर्षे तुरुंगात राहून आलेले आहेत. मध्यंतरी थंडावलेली या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा चालू होणार आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
(हेही वाचा – Railway Reservation: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल्ल)
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामासंबंधित ८५० कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात व अन्य काही प्रकरणांत ईडीने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal), समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याप्रकरणी सुनील नाईक (Sunil Naik), सुधीर साळसकर (Sudhir Salaskar) आणि अमित बलराज (Amit Balraj) हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता.
हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात (Maharashtra Sadan Scam) घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप होता.
(हेही वाचा – Survey on Namo App : तिकीट देण्यापूर्वी नमो ॲप करणार सर्वे ; खासदारांचे टेन्शन वाढलं)
या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही (ED) छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रकरणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक उत्तरे देत असतांना हे प्रकरण उघडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community