देवेंद्र फडणवीसांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील केला आहे. या आरोपाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पत्रकारांशी येवला येथे संवाद साधला.
भुजबळ म्हणाले की, कोण कशाला जरांगेंचा घात करतील. एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या क्षणाला अंतरवाली सराटीमध्ये धावतो. सर्व नाटकं मराठा समाजाला पण समजली. सरकारला पण समजले असून शेपूट वाढतच चालल्याची टीका भुजबळ यांनी केली आहे.
(हेही पहा – PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आखली मोहीम; पंतप्रधान मोदी येत्या १० दिवसांत करणार १२ राज्यांचा दौरा)
चाचपणी करून उमेदवार ठरतील
भाजपाने काही उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील उमेदवार नाही, असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची यादी तयार नसेल, परंतु महाराष्ट्रात काम करणारा उमेदवार कृपाशंकर सिंह यांना यूपीमधून उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील. अजित पवार गटाने १० जागा मागितल्याचा पुनरुच्चार यावेळी भुजबळांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community