भुजबळही 100 कोटींच्या बेनामी संपत्तीचे धनी?

छगन भुजबळांना 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

कायदेशीर कारवाई

या प्रकरणात डायरेक्टर आयकर विभाग (इन्वेस्टिगेशन) मार्फत मुंबईतील सत्र न्यायालयात दावा दाखल करत, कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती देखील मिळत आहे. किरीट सोमय्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

(हेही वाचाः )

भुजबळांना होणार 7 वर्षांची शिक्षा?

मंगळवारी आयकर विभागाने प्रेसनोट जारी केली आहे. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती, बेनामी मालमत्ता त्यांनी कलकत्त्याच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सत्र न्यायालयामध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत फौजदारी प्रक्रिया दावा दाखल करण्यात आला असून, त्याची सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here