छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांना शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून पाठिंबा न मिळाल्याने, आता संभाजी राजे निवडणुकीतून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. शुक्रवारी 11 वाजता पत्रकार परिषद घेत, संभाजी राजे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. संभाजी राजेंच्या पत्रकार परिषदेआधी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून एक व्हिडीओ शेअर करत, विरोधकांना इशारा देण्यात आला आहे.
विरोधकांना सूचक इशारा
छत्रपती संभाजी राजे कार्यकर्त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत, विरोधकांना इशारा दिला आहे. “संभाजीला समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे काळीज शिवाजीचे करावे लागेल, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो”, असा व्हिडीओ शेअर करत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
( हेही वाचा: Ravi Shastri B’Day Special: क्रिकेट विश्वातील एक ‘अष्टपैलू’ व्यक्तिमत्त्व )
संभाजी राजेंची भावनिक पोस्ट
संभाजी राजे यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामध्ये संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजी व्यक्त केली. तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतले स्वराज्य घडवायचे आहे. मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community