मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून, त्यांनी काँग्रेस आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. विजय वडेट्टीवार हे समाजद्वेषी आहेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, अशी टीका संभाजी राजे यांनी केली आहे.
सरकार काहीही करत नाही
बुधवारी संभाजी राजेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षण सोडून जे प्रश्न आहेत ते 15 दिवसांत सोडवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण 2 महिने होऊन गेले तरी सरकार काहीही करत नाही, असा संताप देखील संभाजी राजेंनी यावेळी व्यक्त केला.
(हेही वाचाः आता राष्ट्रवादीचीही स्वबळाची भाषा)
कमी पडतोय असं समजू नका
माझी कुणीही दिशाभूल करू शकत नाही. मी माझे मुद्दे प्रमाणिकपणे मांडत असतो. संसदेत किंवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मी माझे मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत. आमची ताकद कमी पडत नाही, नांदेड आंदोलन ही एक झलक होती. कोरोनामुळे थोडं नमतं घेतोय, याचा अर्थ असा नाही की आम्ही कमी पडतोय. आम्ही सरकारला अल्टीमेटम देत नाही, पण सरकारने याचा विचार करावा. आम्ही कधीही आंदोलनाला बसू, गर्दी झाली तर सरकार जबाबदार असेल, असे देखील संभाजीराजे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community