महाविकास आघाडीने शनिवारी काढलेल्या मोर्चावरुन आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचा उल्लेख नॅनो मोर्चा असा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला, पण हा व्हिडिओ 2017 सालच्या मराठा मोर्चाचा असल्याचे समोर आले आहे.
जरा तरी तमी बाळगा- संभाजीराजे
या व्हिडिओवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मूक मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वत:च्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखवण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवले, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा, असे ट्वीट छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
( हेही वाचा: संजय राऊतांना ‘ते’ ट्वीट भोवणार? मराठा क्रांती मोर्चा दाखल करणार गु्न्हा )
@rautsanjay61 ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2022
राऊतांच्या याच ट्वीट वरुन वाद
देवेंद्र फडणवीस ज्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच… महाराष्ट्रप्रेमी जनतेचा बुलंद आवाज, देवेंद्र जी हे वागणे बरे नाही, जय महाराष्ट्र, असे म्हणत राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्वीट केला.
Join Our WhatsApp Communityदेवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022