राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का? संभाजीराजेंचे कडक शब्दात ट्वीट, सरकारवर टीका

195

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. संभाजीराजे यांनी कडक शब्दांत ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी म्हटले की, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करतेय की काय असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजी राजेंचे ट्वीट 

छत्रपती  संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हटले की, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरु नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच. या ट्वीटमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

राज्यपाल काय म्हणाले होते ?

औरंगाबादच्या डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डाॅक्टर आंबेडकरांपासून ते डाॅक्टर गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले. राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. मात्र, सरकारने याबाबत अद्याप काहीही केले नसल्याने संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.